
रत्नागिरी शहरात आयपीएल फॅन पार्कद्वारे सामान्यांची रंगत पाहण्याची संधी, लकी ड्रॉ व टीव्हीवर झळकता येणार
* इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल २०२४) या संपूर्ण स्पर्धेदरम्यान रोमांचक हंगामातील सामन्यांची प्रेक्षकांना भुरळ घालण्यासाठी फॅन पार्क्सचे देशभरात आयोजन केलेले आहे. भारतातील विविध ५० शहरांमध्ये हे फॅन पार्क्स तयार करण्याचे नियोजन असून त्यामध्ये रत्नागिरी शहराचा देखील समावेश आहे. येत्या शनिवार २७ एप्रिल रोजी रत्नागिरीतील प्रमोद महाजन क्रीडासंकुल मैदानावर रत्नागिरीकरांना मोठ्या स्क्रिनवर सामन्याची रंगत अनुभवण्याची पर्वणी लाभणार आहे.संपूर्ण देशामध्ये बीबीसीआयने देशभरातील फॅन पार्क्सची नावे २० मार्च रोजी जाहीर केली त्यामध्ये रत्नागिरी शहराचा देखील समावेश आहे. यावेळी क्रिकेट प्रेमींना भव्य स्क्रीनवर सामन्यांचा आनंद घेता येणार आहे याशिवाय सामना पाहण्यासाठी येणाऱ्या क्रिकेट प्रेमींना लकी ड्रॉ द्वारे खेळाडूंच्या साह्या असलेले टी-शर्ट जिंकण्याची ही संधी मिळणार आहे या पार्कमध्ये आलेल्या क्रिकेट प्रेमींचे काही सेकंदाचे शूटिंग प्रत्यक्ष मॅचच्या वेळी दाखवण्यात येणार असल्याने टीव्हीवर झळकण्याची संधीही क्रिकेट प्रेमीना मिळणार आहे याबाबत आज रत्नागिरीत पत्रकार परिषदेत बीसीसीआयचे अमित सिद्धेश्वर यांनी सविस्तर माहिती दिली यावेळी रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे बिपिन बंदरकर ,किशोर भुते ,सईद मुकादम अन्य सर्व पदाधिकारी उपस्थित होतेwww.konkantoday.com