
रत्नागिरी तालुक्यातील गोळप-धोपटवाडी येथे आंब्याच्या झाडावरून पडल्याने कामगार जखमी
* रत्नागिरीतालुक्यातील गोळप-धोपटवाडी येथे हापूस आंबा कलमाचे आंबे काढत असताना नेपाळी कामगार झाडावरुन पडला. जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी पावस येथील आरोग्य केंद्रात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सागर रामबहाद्दूर रसायली (वय ३४, रा. धोपटवाडी-गोळप, मुळ ः नेपाळ ) असे जखमी तरुणाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. २५) सकाळी नऊच्या सुमारास घडली. www.konkantoday.com