
रत्नागिरी जिल्ह्यात २८ ठिकाणी सामूहिक गदापूजन
रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण शहरातील वेसमारूती मंदिरासह सर्वच तालुक्यांमध्ये २८ ठिकाणी सामूहिक गदापूजन करण्यात आले. त्याला ठिकठिकाणी ९०० धर्मप्रेमी, भाविक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. रामराज्याच्या स्थापनेसाठी हिंदूनी मारूतीरायाप्रमाणे भक्ती अन शौर्य वाढवणे आवश्यक असल्याचे हिंदू जनजागृती समिती राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी सांगितले.श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने गदापूजनाच्या माध्यमातून हिंदूंमधील शौर्य जागृत व्हावे आणि रामराज्याच्या कार्यासाठी अध्यात्मिक बळ मिळावे, या उद्देशाने हिंदू जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या सहभागाने देशभरात ७५७ ठिकाणी सामूहिक गदापूजन करण्यात आले. वैस मारूती मंदिर, चिपळूण येथे उद्योजक अमित जोशी, निखिल किल्लेकर भाजपा प्रदेश सदस्यय, अभिनव भुरण मनसे चिपळूण शहर प्रमुख, विक्रम जाोशी, सहसेक्रेटरी जिल्हा सोशल मिडिया आशीर्वाद लोखंडे, अनुराग रायगर, ओमी कदम, सुरज कदम, अंकिता बनसोडे, हिंदू जनजागृती समितीचे महेश लाड, सनातन संस्थेचे केशव अष्टेकर आदी उपस्थित होते. www.konkantoday.com