
रस्त्याअभावी राजापूर तालुक्यातील आजिवली सुर्वेवाडीतील वयोवृध्दांची यातायात
राजापूर तालुक्यातील आजिवली गावातील मुख्य रस्त्यापासून सुर्वेवाडी वस्तीला जोडणारा रस्ता अद्याप झालेला नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः आजारी व्यक्तींना दवाखान्यात नेणे, दैनंदिन गरजेच्या वस्तू आणणे तसेच पावसाळ्यात चिखलातून जाणे ही त्यांच्यासाठी मोठी कसरत ठरत आहे. सुमारे ६० ते ७० वर्षापासून सुर्वेवाडी ही रस्त्यापासून वंचित असल्याची ग्रामस्थांची कैफियत आहे.
वयोवृध्दांना चालणे कठीण असताना दररोजचा प्रवास हा त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. जुन्या साकवावरून जीव मुठीत धरून जावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.www.konkantoday.com




