
जि.प.चे माजी अध्यक्ष बुवा गोलमडे यांचे निधन
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, हरिओम सतनाम शिरगांव या संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. तुकाराम उर्फ बुवा पांडुरंग गोलमडे (७५) यांचे वृद्धापकाळाने बुधवारी रात्री निधन झाले.गोलमडे हे वारकरी संप्रदायाचे असल्याने त्यांना बुवा या टोपण नावाने ओळखले जात होते. सामाजिक कार्यात ते हीरीरीने सहभाग घेत असत. चिपळूण शिवाजी चौक येथे सदगुरू कृपा नावाचे दुकान ते चालवत होते. त्यामुळे त्यांची व्यापारवर्गासह सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेली होती. कुणबी समाजाचे नेते म्हणून समाजाच्या प्रत्येक कार्यात व चळवळीत त्यांच योगदान होते. हरिओम सतनाम शिरगाव या संस्थेचे ते अध्यक्ष होते. रत्नागिरी जिल्हा परिषदेत त्यांनी तीनवेळा मालदोली जि.प. गटाचे नेतृत्व करताना एकदा शिक्षण व अर्थ समितीचे सभापतीपद व २०१६ मध्ये अध्यक्षपद भूषविले. या काळात त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे केली. गुरूवारी सकाळी त्यांच्यावर केतकी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. www.konkantoday.com