
कोकणातील कातळशिल्पावरील सचित्र दिनदर्शिका राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेट देण्याचा कार्यक्रम राजभवनावर पार पडला
कोकणला मोठा ठेवा लाभलेल्या कातळशिल्प जगातील जनतेसमोर यावे या हेतूने कोकणटुडेच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या कातळ शिल्पावरील सचित्र दिनदर्शिका नुकतीच राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेट देण्याचा कार्यक्रम पार पडला. काेकणटुडे संपादक सुदेश शेट्ये यांनी ही कातळ शिल्पावरील सचित्र दिनदर्शिका राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिली
या वेळी आ. आशिष शेलार, माजी आ. बाळ माने व अन्य मान्यवर उपस्थित होते.
कोकणातील अनेक भागात सापडलेल्या अश्मयुगीन कातळशिल्पामुळे कोकणातील पर्यटनाला आणखीन महत्व आले आहे. कातळशिल्पाच्या संवर्धन व विकासासाठी रत्नागिरीतील निसर्गयात्री संस्था कार्यरत आहे. या कातळशिल्पावरील सचित्र दिनदर्शिका प्रसिद्ध करण्यात आली होती. ही दिनदर्शिका राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राजभवनात झालेल्या एका कार्यक्रमाच्यावेळी भेट देण्यात आली. आपणाला कोकणातील कातळशिल्पाबाबत माहिती असल्याचेही राज्यपाल महोदय यांनी आवर्जुन यावेळी सांगितले.
कातळशिल्पाबाबतची दखल आता सर्वच पातळीवर घेतली जात असल्याने आगामी काळात कातळशिल्पासारखे नवीन दालन पर्यटन क्षेत्रात उपलब्ध होईल व कोकणच्या पर्यटन विकासात भर पडेल असा विश्वास व्यक्त होत आहे.
www.konkantoday.com
