खासदार झाल्यावर रत्नागिरीचा एकही प्रश्न शिल्लक ठेवणार नाही, महायुतीचे उमेदवार नारायण राणेंची ग्वाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी ही देशाची गरज आहे. मोदी यांनी गुणात्मक विकास देशाचा केला. म्हणून अब की बार मोदीच. मलाही कोकणासाठी काही करायचे आहे. या लोकसभा निवडणुकीसाठी मला सगळ्यांचा पाठिंबा आहे. निवडणुका येतील, जातील पण रत्नागिरी-सिंधुदुर्ग हे जिल्हे आर्थिक प्रगत असावेत असे आमचे प्रयत्न आहेत. मी खासदार झाल्यावर रत्नागिरीचा एकही प्रश्न शिल्लक ठेवणार नसल्याचे महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितले.www.konkantoday.com