कर्मचार्‍यांच्या कलागुणांना वाव देणार्‍या महावितरणच्या आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेला प्रारंभ

महावितरणच्या अधिकारी कर्मचार्‍यांच्या कार्यक्षमतेत वाढ व्हावी. कला जोपासण्याची संधी मिळावी. त्यात कर्मचार्‍यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून पुन्हा ग्राहकसेवेसाठी जोमाने कामाला लागावे, यासाठी दरवर्षी क्रीडा व नाट्यस्पर्धेचे आयोजन केले जात असल्याचे प्रतिपादन संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे यांनी केले. रत्नागिरीत महावितरणच्या आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेस थाटात प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते.रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात आयोजित नाट्यस्पर्धेचे उदघाटन संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे व जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी अध्यक्षांनी मुख्य अभियंता परेश भागवत, मुख्य अभियंता श्रीमती सुचित्रा गुजर, मुख्य अभियंता धनंजय औढेकर (कल्याण परिमंडल), मुख्य अभियंता सुनिल काकडे (भांडूप परिमंडल), अधीक्षक अभियंता स्वप्नील काटकर, अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांची उपस्थिती होती. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button