
भाऊ कार्ले यांना-“शाहीर अण्णाभाऊ साठे कलाभूषण पुरस्कार जाहीर”
चिपळूण- शाहीर अण्णाभाऊ साठे बहूउद्देशीय संस्था,सांगली यांचेतर्फे चिपळूण मधील ज्येष्ठ रंगकर्मी श्री.भाऊ कार्ले यांना राज्यस्तरीय सांस्कृतिक क्षेत्रामधील कार्याबद्दल “कलाभूषण” पुरस्कार जाहीर झाला आहे असे संस्थेचे अध्यक्ष श्री.संतोष नेताजी कांबळे सांगली यांनी जाहीर केले.गेल्या चाळीस वर्षातील हौशी रंगभूमिवरील सेवाकर्याचा आढावा घेऊन यांना हा पुरस्कार प्रप्त झाला आहे.
भाऊ कार्ले 1980 पासून हौशी रंगभूमीवर कार्यरत असून त्यांनी सुरूवातीला प्रशांत पटवर्धन,तात्या आवले,संज्या कदम,मना शिंदे आणि सुमारे चाळीस हौशी कलाकारांना घेऊन ‘कनक(कलेला नमन करणारे)’ ग्रुप ची स्थापना केली.नंतर संघर्ष क्रीडामंडळाचे भाऊ काटदरे,नयन साडविलकर यांच्या सहकार्याने सातत्याने सलग 15 वर्ष कनक-संघर्ष सांस्कृतिक-अभिनय,नृत्य,गायन स्पर्धांचे आयोजन केले. “दै.सागर” तर्फे पाच वर्ष राज्यनाट्य स्पर्धेचे समिक्षण केले.तसेच साखरपा ग्रामीण भागात 1990 पासून श्री दत्त जयंती निमित्त,श्री.दत्तसेवा तरुण मंडळाच्या सहकार्याने गेले 30 वर्ष विविध कला-क्रीडा स्पर्धांचे ते आयोजन करत आहेत.तसेच नुकत्याच त्यांनी कनक तर्फे राज्यस्तरीय ऑनलाइन अभिनय व श्री.गणपति अथर्वशीर्ष पठण स्पर्धांचे आयोजन केले.त्यांना स्वतःला विवध राज्यस्तरीय एकांकिका,अभिनय,नाट्यलेखन,दिग्दर्शन स्पर्धांमध्ये सुमारे 275 वैयक्तिक पारितोषिके प्रप्ता झाली आहेत.त्यांच्या कुटुंबियांची भक्कम साथ तसेच त्यांच्या पत्नी प्रिया कार्ले यांनी सुद्धा स्पर्धा आयोजनात लिखाण करणे व नाटकांमध्ये गरज पडली तर स्वतः भूमिका करून त्यांना कायम सहकार्य केले.
या प्रवासात त्यांना त्यांचे नाट्यगुरु श्री.कांता कानीटकर ,राहुल सोलापूरकर,आदेश बांदेकर,प्रकाश उर्फ दाजी देशपांडे,स्व.नाना जोशी,प्रशांत दामले यांचे अनमोल सहकार्य लाभले.नुकताच त्यांना मनुष्यबळ लोकसेवा अकादमीचा ‘जीवन गौरव’ पुरस्कार देखील मिळाला आहे.
या त्यांच्या उज्ज्वल यशाबद्दल जनता बँक पुणे,चिपळूण तर्फे मॅनेजर श्री.संदीप देशपांडे,सौ प्राजक्ता पळशीकर,श्रीरंग चितळे.मॉन्टी मोने व सेवकांनी खास अभिनंदन केले.
www.konkantoday.com