
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी विनायक राऊत यांना प्रचंड बहुमताने निवडून देणार
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांना प्रचंड बहुमतांनी निवडून देण्याचा निर्धार आमदार राजन साळवी यांनी ओणी येथील बैठकीत व्यक्त केला.रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ राजापूर तालुक्यातील ओणी जिल्हा परिषद गटाची प्रचारसभा गजानन मंगल कार्यालय, ओणी येथे पार पडली. या बैठकीला शिवसेना नेते तथा खासदार विनायक राऊत, शिवसेना उपनेते तथा आमदार राजन साळवी यांच्यासह लोकसभा संपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक, कॉंग्रेस पक्ष राज्य कार्यकारिणी सदस्य तथा माजी आमदार हुस्नबानू खलिफे, माजी आमदार गणपत कदम, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, आप जिल्हाध्यक्ष परेश साळवी, आप जिल्हाध्यक्ष हबीब सोलकर, उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, विधानसभा संपर्क प्रमुख ऍड. चंद्रप्रकाश नकाशे आदी मान्यवर उपस्थित होते. www.konkantoday.com