रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील काळिंजेच्या खाडीत दुर्मिळ समुद्री घोड्याचे दर्शन
मंगळवारी (ता.23) सकाळी दहा वाजता काळींजे येथील मच्छीमार अनीस फणसोपकर खाडीत मासेमारी करत असताना त्यांना जाळ्यात हा समुद्री घोडा आढळला. खाडीत कोळंबी पकडण्यासाठी पाग टाकलेला असताना, त्या जाळ्यात नारंगी रंगाचा समुद्री घोडा फणसोपकर यांना आढळला. त्यांनी या समुद्री घोड्याला जाळ्याबाहेर काढले आणि याची माहिती कांदळवन प्रतिष्ठानचे सहाय्यक संशोधक मोहन उपाध्ये यांना दिली. त्यांनी या समुद्री घोड्याची पाहणी करुन फणसोपकर आणि विक्रांत गोगरकर यांच्या मदतीने पुन्हा त्याला खाडीत सोडले.या समुद्री घोड्याची लांबी १३ सेमी होती. समुद्री घोडा हा भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत संरक्षित असून त्याला वाघाएवढे संरक्षण देण्यात आले आहे. www.konkantoday.com