राज्यासह कोकणात वाढत्या उष्म्याचा फटका पर्यटन व्यवसाय रोडावला
राज्यात सर्वत्र उष्णतेचा आलेख वाढला आहे. उन्हाळ्यातून बाहेर न पडण्याचा सल्ला देखील वैद्यकीय विभागाकडून देण्यात येत आहे. वाढलेल्या उष्णतेचा परिणाम मिनिमहाबळेश्वरच्या म्हणजेच दापोलीच्या पर्यटन हंगामावरदेखील झाला आहे. परीक्षा संपल्या असल्या तरी वाढत्या उष्म्यामुळे पर्यटकांनी बाहेर पडणेच रद्द केल्याने हॉटेल व्यावसायिकांना पर्यटकांची वाट पहात बसावे लागत आहे.दापोली तालुक्यातील कर्दे, मुरूड, लाडघर, हर्णै, पाळंदे ही गावे विशेष पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. ऑक्टोबर ते जून महिन्यापर्यंत पर्यटन हंगाम सुरू असतो. मार्च महिना तसेच एप्रिल १५ तारखेपर्यंत परीक्षांमुळे पर्यटकांची संख्या प्रचंड कमी असते. त्यामुळे या कालावधीत पर्यटन व्यावसायिकांना हातावर हात घेवून बसावे लागते. मात्र १५ एप्रिल नंतर परीक्षा संपताच पर्यटन हंगाम जोरदारपणे सुरू होतो.यावर्षी निवडणूक हंगामामुळे पर्यटन हंगामाला फटका बसण्याची शक्यता यापूर्वीच व्यक्त करण्ययात आली होती. मात्र आता वाडता उष्मा पर्यटनाला खो घालण्याच्या तयारीत आहे. मोठ्या प्रमाणात उष्मा वाढल्यामुळे पर्यटकांनी बाहेर पडणे टाळले आहे. यामुळे पर्यटन क्षेत्र पयर्यटकांविना शांत झाल्याचे चित्र आहे परंतु १५ मे नंतर निवडणुका संपत असल्याने त्यानंतर पर्यटकांची संख्या वाढेल असा अंदाज हॉटेल व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे. www.konkantoday.com