मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती अचानक खालावली
*मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती अचानक खालावली आहे. ते आज येरमाळा येथे आले होते. त्यांचा पुढील येडशी, कळंब, धाराशिव, बीड भागातील दौरा रद्द करण्यात आला असून, प्रकृती अस्वस्थ्यामुळे ते छत्रपती संभाजी नगरकडे रवाना झाले.त्यांना संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले आहे.मनोज जरांगे पाटील गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. वेगवेगळ्या भागात त्यांनी मराठा समाजाच्या बैठका घेत जनजागृती सुरू ठेवली आहे. ते बुधवारी धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा भागात दौऱ्यावर होते. कुलस्वामिनी येडेश्वरी मातेचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी मराठा समाज बांधवांशी संवाद साधला. त्यानंतर पुढील दौऱ्यावर जात असताना त्यांना अचानक त्रास सुरू झाला. प्रकृती खालावत असल्याने त्यांचे पुढील दौरे रद्द करण्यात आले असून, त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.www.konkantoday.com