पालकमंत्री उदय सामंत मिळवून देणार रत्नागिरीतून नारायण राणेंना एक नंबरचे मताधिक्य
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी विधानसभेअंतर्गत येणार्या सर्व जिल्हा परिषद गटात या २६ एप्रिलपासून पुढील काही दिवस महायुतीच्या मेळाव्यांचा धडाका लावणार आहे. या मतदार संघासाठी वेळ देवून महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना जास्तीत जास्त मताधिक्याने विजय मिळवून देण्यासाठी शिवसेनेचा प्रयत्न राहणार आहे. प्रत्येक जि.प. गटात किमान साडेतीन ते चार हजार मतदारांची उपस्थिती राहिल, असे राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री सामंत यांनी मंगळवारी रत्नागिरीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी रत्नागिरी विधानसभा मतदार संघात जि.प. गटनिहाय घेण्यात येणार्या मेळाव्यांच्या नियोजनाबाबत माहिती दिली. मेळाव्यांद्वारे रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्येही समन्वय साधणार असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळेल. रत्नागिरी विधानसभेचा त्यामध्ये वाटा पहिल्या नंबरचा असेल असेही सामंत यांनी सांगितले. रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. www.konkantoday.com