देवरूख नगरपंचायतीच्या उभारलेल्या घनकचरा प्रकल्प इमारतीबाहेर कचर्याचे साम्राज्य
ओला व सुक्या कचर्यावर प्रक्रिया करण्यासाठी देवरूख नगरपंचायतीने कोट्यवधी रुपये खर्च करून घनकचरा प्रकल्प इमारत उभारली आहे. मात्र असे असताना देखील काही कचरा घनकचरा प्रकल्प इमारती बाहेर पडून असल्याचे चित्र आहे. कोंबड्यांची पिसे व टाकावू घटक टाकण्यासाठी नगर पंचायतीने चक्क खड्डा खोदला आहे. मात्र टाकावू पदार्थ उघड्यावर टाकले जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. कावळे, कुत्री ही घाण इतरत्र नेत आहेत. परिणामी याचा त्रास कांजिवरा परिसरातील नागरिकांना होणार आहे.देवरूख शहरातील कचरा गोळा करण्यासाठी चार वाहने तैनात करण्यात आली आहेत. ही वाहने दररोज परिसरात फिरून ओला व सुका कचरा गोळा करतात. या कचर्यावर प्रक्रिया करण्यासाठी देवरूख नगरपंचायतीने कांजिवरा येथे घनकचरा प्रकल्प उभारला आहे. दररोज दोन टन कचरा गोळा होतो. अनेक महिन्यांच्या प्रक्रियेनंतर जानेवारीमध्ये हा प्रकल्प नागरिकांच्या सेवेत दाखल झाला. ओल्या कचर्यापासून कंपोस्ट खत तयार केले जात आहे. चार महिन्यांच्या कालावधीत ६ टन खत तयार झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र प्लास्टीक, लोखंड, बाटल्या या प्रकल्पात पडून असल्याचे चित्र आहे.www.konkantoday.com