
जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या शिक्षकांची रिक्त पदे भरली जाणार
जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या रिक्त पदांची संख्या लक्षात घेवून शासनाने १ हजार ६८ पदांवर उमेदवारांची मार्च महिन्यात केलेली भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती. पण लोकसभा आचारसंहितेचा कालावधी नियुक्तीच्या प्रक्रियेवर निर्बंध आले. याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाने राज्य शासनाकडे मागवलेले मार्गदर्शन पत्र जिल्हा परिषदेला प्राप्त झाले आहे. यामुळे निवडणूक आटपताच मेच्या दुसर्या आठवड्यात नव्या शिक्षकांच्या नियुक्तीसाठी तत्काळ कार्यवाही होणार आहे.शासनाकडून रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये पवित्र पोर्टलमधून १ हजार १४ शिक्षकांची नव्याने नियुक्ती झाली परंतु अंतिम नियुक्तीपत्र देताना लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत ही भरती प्रक्रिया अडकली. जिल्ह्यातील प्राथमिक शाळांच्या रिक्त पदांची संख्या लक्षात घेवून शासनाने १ हजार ६८ पदांवर उमेदवारांची भरती केली होती. त्यापैकी १ हजार १४ च उमेदवार या प्रक्रियेला हजर राहिले होते. ही प्रक्रिया आॉनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती. केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्याने आदर्श आचारसंहिता लागू झाली. आचारसंहितेचा कालावधी नियुक्तीच्या प्रक्रियेवर निर्बंध आले आहेत. www.konkantoday.com