कोकणातील वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस धावणार नसल्याची चर्चा प्रवाशांमध्ये सुरू
* उन्हाळी सुट्टीपासून म्हणजेच मे महिन्यापासून ते गणपतीपर्यंत म्हणजे सप्टेंबरपर्यंत कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक असते. कोकणात जायचं असेल तर, सहज तिकीट मिळत नाही.त्याकरीता आगोदर तिकीट आरक्षित करावे लागते. मात्र, कोकण रेल्वे मार्गवार येणाऱ्या काही अडथळ्यांमुळे अनेक गाड्यात रद्द केल्या जातात. अशात, 10 जूननंतरची कोकणातील वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. याबाबात IRCTCच्या संख्येतस्थळावर संदेश देण्यात आला आहे. त्यामुळे 10 जूननंतर कोकणात जाण्याकरीता तिकीट आरक्षित करताना प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामना करावा लागण्याची शक्यता आहे.10 जूननंतरची कोकणात जाणारी वंदे भारत आणि तेजस एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. याबाबात IRCTCच्या संख्येतस्थळावर संदेश देण्यात आला आहे. विशेष म्हणजे वंदे भारत आणि तेजस एक्स्प्रेस रद्द झाल्याचा संदेश जरी IRCTC वर देण्यात आला असला तरी, गेल्या काही दिवसांपासून 10 जूननंतरची तिकिटे काढता येत नाही आहेत. त्यामुळे पावसाळ्यात कोकणातील वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस धावणार नसल्याची चर्चा प्रवाशांमध्ये सुरू झाली आहे.www.konkantoday.com