
रत्नागिरी जिल्ह्यात विवाहित पुरुषांचाही होतो आहे छळ !
सासरच्या लोकांकडून किंवा पतीकडून छळ होणाऱ्या महिलांच्या तक्रारी अनेकदा ऐकत आलाे आहाेत .मात्र रत्नागिरी येथील महिला दक्षता कक्षात जिल्ह्यातील ५६ पुरुषांनीही आपला पत्नी व सासरच्या लोकांकडून छळ होतो अशा तक्रारी दाखल केल्या आहेत.यामुळे पुरुषांनाही छळण्याचे प्रकार वाढत असल्याचे तक्रारीवरून दिसत आहे.
सध्याच्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये महिलांचा छळ होण्याचे प्रमाण वाढले होते त्यामुळे महिलांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने महिला सुरक्षा कक्ष स्थापन करण्यात आली आहे. या महिला कक्षात वीस महिन्यात दोनशे अकरा तक्रार अर्ज दाखल झाले आहेत त्यामध्ये १५४महिलांनी तर ५७ पुरुषांनी तक्रार अर्ज केले आहेत. पुरुषांनीही आपल्या तक्रार अर्जात विवाहानंतर आपला मानसिक व शारीरिक छळ होत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. पत्नी व तिच्या नातेवाईकांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून पुरुषांनीही या कक्षाकडे धाव घेऊन तक्रारी केल्या आहेत .
www.konkantoday.com