आरजीपीपीएल प्रकल्पातील एकूण १६७ कामगारांची कपात होणार
आरजीपीपीएलमधील (रत्नागिरी गॅस) दाभोळ ब्रेक वॉटर प्रकल्पातील एकूण १६७ कामगारांची कपात केली जाणार आहे. १५ मेनंतर ही कपात करण्यात येणार असून तशी नोटीस एक महिन्यापूर्वीच कामगारांना देण्यात आली आहे. ऐन लोकसभा निवडणुकीत हा मुद्दा तापणार असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या कामगारांच्या बाजूने ठामपणे राहण्याचा निर्णय घेतला आहे.गुहागर तालुक्याच्या औद्योगिकीकरणात महत्वाची भूमिका बजावणारा आरजीपीपीएल प्रकल्प हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने वादाचा विषय बनला आहे. अगोदरच गॅसच्या तुटवड्यामुळे कमी झालेली वीजनिर्मिती, विजेचा महागडा दर अशामध्ये भरडला गेलेल्या या प्रकल्पाने यापूर्वीच प्रमाणात कर्मचारी कपात केली आहे. यामध्ये सर्वाधिक स्थानिक कामगार होते. या प्रकल्पाने आपल्या कार्यक्षेत्रातील अंजनवेल, वेलदूर, रानवी या तीन ग्रामपंचायतींचा कोटीचा कर थकविला आहे. तसेच यंदाही ऐन पाणीटंचाईच्या काळात अंजनवेल गावाला ग्रामपंचायतीने मागणी करूनही टँकरने पाणीपुरवठा केलेला नाही. www.konkantoday.com