लांजा शहरात मुंबई-गोवा महामार्गावर बर्निंग टेम्पोचा थरार

लांजा शहरात मुंबई-गोवा महामार्गावर इंडियन ऑईल पंपाजवळ रेस्टहाऊस येथे उभ्या असणार्‍या आयशर टेम्पोने अचानक पेट घेतल्याची घटना सोमवारी सकाळी ७.३० ते ७.४५ च्या दरम्यान घडली. येथील नगरसेवक संजय यादव यांनी याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते व पाणी व्यावसायिक नंदू सुर्वे यांना दिली. त्यानंतर ते आपल्या पाणी टँकरसह घटनास्थळी दाखल झाले अन काही वेळातच ही आग आटोक्यात आणण्यात आली.सोमवारी सकाळी साडेसात ते पावणेआठच्या सुमारास आयशर टेम्पो क्र. (एम.एच. ०८ एपी ७१२४) हा लोखंडी साहित्य घेवून राजापूरकडे चालला होता. लांजा रेस्टहाऊस येथे पेट्रोल पंपानजिक तो उभा होता. मात्र उभा असताना अचानक या टेम्पोने पेट घेतला. टेम्पोला आग लागल्याचे लक्षात येताच येथील हॉटेल व्यावसायिक व नगरसेवक संजय यादव यांनी प्रसंगावधान राखत कुवे गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य आणि पाणी व्यावसायिक नंदकुमार सुर्वे यांना या बाबतची माहिती दिली. त्यानंतर नंदकुमार सुर्वे हे आपले पाणी टँकरसह घटनास्थळी दाखल झाले.  www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button