
राजापूर तालुक्यातील मूर सुतारवाडी येथील संतोष सुतार यांच्या काजू बागेला आग, २०० काजूची कलमे खाक
अचानक लागलेल्या वणव्यामुळे राजापूर तालुक्यातील मूर सुतारवाडी येथील शेतकरी संतोष सुतार यांची काजू बाग नुकतीच जळून खाक झाली. या आगीमध्ये संतोष सुतार यांची २०० काजूची कलमे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असून त्यांचे सुमारे २ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. भरदिवसा त्यांच्या डोळ्यासमोर बाग जळल्याने सुतार यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.संतोष सुतार हे दिव्यांग आहेत. स्वतः दिव्यांग असूनही ते एक ते दीड किलोमीटर अंतराहून पाणी आणून ती बाग त्यांनी वाढवली होती. मागील २ वर्षापासून त्यांना या बागेतून वर्षाला २ लाख रुपये उत्पन्न मिळत होते. त्यांच्या वर्षाचा उदरनिर्वाह या बागेवरती चालत होता. उत्पन्नाचे अन्य कोणतेही साधन नसल्याने त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे. या घटनेमुळे त्यांना बसलेल्या धक्यातून अजूनही ते सावरलेले नाहीत. शासनाने या शेतकर्याला तातडीने मदत करण्याची मागणी परिसरातील शेतकर्यांनी केली आहे.www.konkantoday.com