रत्नागिरीची हद्दवाढ, कारवांचीवाडीत नवी बाजारपेठ हवी -नाचणेचे माजी सरपंच संतोष सावंत
रत्नागिरीत विकासाचा धुरळा उडलाय खरा पण जनता मात्र ज्ञुसमटतेय आणि हे टाळायचे असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. रत्नागिरी शहराची हद्दवाढ झालीच पाहिजे. कारवांचीवाडी येथे स्वतंत्र बाजारपेठ उभारावी अशी मागणी नाचणेचे माजी सरपंच संतोष सावंत यांनी केली आहे.ते म्हणाले रत्नागिरी शहरात चाललेल्या विकास कामांमुळे सुट्ट्यांच्या काळात लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सध्या रत्नागिरी शहरातील मुख्य रस्त्याचे कॉंक्रीटीकरण होत आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. ऐन हंगामात दुकानदारांचे प्रचंड नुकसान होत आहे आणि यासाठी आता असलेल्या कामाचा वेग अधिक यंत्रणा लावून वाढवावा लागेल. वेळ आली तर रात्रीच काम देखील सुरू करवे लागेल याची नोंद घ्यावी. रत्नागिरी शहरामध्ये मुख्य एसटी स्टृडचे काम जोरात सुरू आहे. पण गेली कित्येक दिवस लोकांचे हालच होत आहेत. त्याचवेळी रहाटाघर येथील एसटी स्टँडचे देखील काम सुरू आहे. तिथे तर न बोलण्यासारखी परिस्थिती आहे.आता जिल्हाधिकारी कार्यालय येथे काम चालू असल्याने जयस्तंभ येथे रस्त्यावर गाड्या पार्क केल्या जात आहेत. एकंदरीत लोक विकास कामात घुसमटत आहेत. ही आजची परिस्थिती आहे. त्यामुळे आपल्या लोकप्रतिनिधींनी दूरदृष्टी ठेवावी. राजकारण बाजूला ठेवून शहराची हद्दवाढ करावी. नवीन बाजारपेठ कारवांचीवाडी परिसरामध्ये नियोजित करावी असे त्यांनी म्हटले आहे. www.konkantoday.com