
डॉ. नाझीम पडवेकर यांना कोकण उद्योगरत्न पुरस्कार
कोकणचे सुपुत्र विविध विषयांवर सखोल अभ्यास व संशोधन करून समाजातील विविध क्षेत्रातील लोकांना मार्गदर्शन करणारे डॉक्टर नाझीम पडवेकर यांना त्यांच्या अभिनव संशोधित चिकित्सा पद्धती कॅन्सर, हृदयरोग तसेच मेंदू विकारावर होप ओंको इम्युनोथेरपीसाठी कोकण उद्योगरत्न हा पुरस्कार जाहीर झाला आहे.हा पुरस्कार सोहळा मुंबईतील लँड ऍण्ड या पंच तारांकीत हॉटेलमध्ये २० एप्रिल रोजी संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.हा पुरस्कार स्विफ्ट एन लिफ्ट संस्थेच्यावतीने संस्थेचे संस्थापक आणि सीईओ निलेश साबे, प्रार्थना बेहेरे-सिने तारका या मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या पारितोषिकासाठी कोकणात सर्व स्तरावर त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.www.konkantoday.com