सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालय येथे जागतिक वसुंधरा दिना निमित्त वृक्षारोपण सोहळा
सिंधुदूर्ग:- जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत गायकवाड यांच्या हस्ते जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावण्यात आली. ‘झाडे लावा, झाडे जगवा, देश वाचवा’ हा संदेश न्यायाधीश श्री. गायकवाड यांनी यावेळी दिला. २२ एप्रिल हा दिवस जागतिक वसुंधरा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी वसुंधरा दिनाचे अनेक कार्यक्रम घेतले जातात. सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात परिसरातील जागा उपलब्ध असल्याने या दिवशी वृक्षारोपण करण्यात आले. जांभूळ, आवळा, बेहडा, करंज या जातीची रोपे वन विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आली. प्रत्यक्ष वृक्षारोपण कार्यक्रमाला जिल्हा वनरक्षक मगदूम उपस्थित होते. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव ए. बी. करणे, जिल्हा न्यायालय व्यवस्थापक प्रशांत माळकर उपस्थित होते. www.konkantoday.com