लोकसभा निवडणुकीसाठी गाव विकास समिती जाहीर करणार कोकणच्या जनतेचे मागणी पत्र

गाव विकास समितीचे सरचिटणीस डॉक्टर मंगेश कांगणे यांची माहितीदेवरुख:-लोकसभा निवडणुकीत सर्वसामान्य मतदारांनी कोकणातील जनतेच्या अपेक्षा काय?या ओळखून मतदान करावे यासाठी गाव विकास समिती रत्नागिरी जिल्हा संघटनेमार्फत कोकणच्या जनतेचे मागणी पत्र जाहीर केले जाणार आहे.लोकसभा निवडणूक आणि स्थानिक ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक यामध्ये फरक असून या सर्व निवडणुकांचे विषय हे वेगळे असायला पाहिजेत. त्याच त्याच विषयांवर नेते मंडळी मत मागायला येत असतील तर जनतेने जागृत होऊन मतदान करायला हवे ही या मागची भूमिका असल्याचे गाव विकास समितीचे सरचिटणीस डॉक्टर मंगेश कांगणे यांनी म्हटले आहे.गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड,संघटन प्रमुख सुहास खंडागळे व उपाध्यक्ष राहुल यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणच्या जनतेचे मागणी पत्र गाव विकास समितीमार्फत जाहीर केले जाणार असल्याचे डॉक्टर कांगणे यांनी म्हटले आहे.लोकसभेच्या निवडणुकीत देशपातळीवरील विषयांना मतदारांनी महत्त्व द्यावे. लोकसभेची निवडणूक ही देशात कोणते सरकार बसणार हे ठरवणारी असल्याने या निवडणुकीत स्थानिक प्रश्नांपेक्षा व्यापक जनहिताचे प्रश्न महत्त्वाचे असल्याचे गाव विकास समितीचे मत आहे. स्थानिक गावपातलीवरील प्रश्नांसाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदा या निवडणुका होत असतात. त्याचबरोबर विधानसभेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा स्थानिक प्रश्न महत्त्वाचे असतात.लोकसभा निवडणुकीत मतदान करताना देशाच्या उज्वल भविष्याचा विचार करावा व मतदारांमध्ये प्रत्येक निवडणुकीबाबत सजकता यावी या उद्देशाने गाव विकास समिती कोकणच्या जनतेचे मागणी पत्र प्रसिद्ध करणार असल्याचे कांगणे यांनी म्हटले आहे.कोकण ही समाजसुधारक आणि महापुरुषांची भूमी आहे.परिणामी कोकणातून जाणारा खासदार हा लोकशाही मूल्य जपणारा,लोकशाही जतन करण्यासाठी कोकणातून प्रतिनिधित्व करणारा, कोकणात रोजगार उद्योग व्यवसाय वाढवताना येथील निसर्ग सौंदर्याला धक्का लागणार नाही याची काळजी घेणारा असावा. संपूर्ण कोकण किनारपट्टीचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी आवाज उठवणारा असावा अशा आशयाचे मुद्दे या मागणी पत्रात असणार असल्याची माहिती गाव विकास समितीचे सरचिटणीस डॉक्टर मंगेश कांगणे यांनी दिली आहे.गाव विकास समितीच्या मागणी पत्रात येथील सामान्य जनतेच्या भावना समाविष्ट असतील असेही डॉक्टर मंगेश कांगणे यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button