
रायगडात नावाशी साधर्म्य असणार्या व्यक्तीनी उमेदवारी अर्ज भरल्याने मतफुटीचा धोका
रायगडच्या महायुतीकडून सुनिल तटकरे आणि महाविकास आघाडीकडून अनंत गीते हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीत विजय व्हावा यासाठी हे दोन्ही नेते पूर्ण ताकदीने प्रयत्न करीत आहेत. मात्र ही जागा सध्या एका आगळ्यावेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. येथे तटकरे आणि गीते यांच्यात थेट लढत होणार आहे, असे म्हटलं जातय. मात्र या दोन्ही उमेदवारांची वेगळ्याच कारणामुळे डोकेदुखी वाढली आहे. येथे गीते आणि तटकरे यांच्या नावाशी साधर्म्य असणार्या व्यक्तीनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. त्यामुळे येथे या दोन्ही प्रमुख उमेदवारांपुढे मतफुटीचा धोका निर्माण झाला आहे.महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरे यांच्यादेखील नावात साधर्म्य असणार्या व्यक्तीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र त्यांच्या नावाशी साधर्म्य असणार्या सुनिल दत्ताराम तटकरी या व्यक्तीनेदेखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. येथे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ही २२ एप्रिल आहे. त्यामुळे आगामी काळात नावात साधर्म्य असणार्या व्यक्ती आपले अर्ज मागे घेणार का, असा प्रश्न समोर उभा राहिला आहे.रायगडच्या निवडणुकीत अनंत गीते हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. मात्र त्यांच्यासारखेच नाव असणार्या आणखी दोन अनंत गीतेंनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. येथे ७ मे रोजी तिसर्या टप्प्यात मतदानाची प्रकियिा पार पडणार असून अनंत गीते, अनंत बाळोजी गीते नावाच्या दोन व्यक्तीनीदेखील अपक्ष म्हणून आपला अर्ज भरला आहे. तर अनंत गंगाराम गीते हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत. म्हणजेच येथे अनंत गीते नावाचे एकूण तीन उमेदवार झाले आहेत. अनंत गीते यांच्या नावात साधर्म्य असलेल्या व्यक्तींना उभे करून त्यांची कोंडी करण्यासाठी विरोधकांनी ही चाल खेळल्याचे बोलले जात आहे.www.konkantoday.com