राजापुरवासियांच ठरलंय मोदीजींनाच साथ देणार !
राजापूर येथे महायुती कार्यकर्ता समन्वय समितीची बैठक उत्साहात संपन्न झाली. या बैठकीला रविंद्र चव्हाण साहेब यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कुठल्याही कामात समन्वय असला, की ते काम यशस्वी होतं. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ निवडणुकीचा प्रचार करताना आपल्या परीसरातील कार्यकर्त्यांमध्ये समन्वय राखण्याची महत्त्वाची जबाबदारी तुम्हा सर्वांवर आहे. तेव्हा वक्तशिर, सुनियोजित आणि समन्वय साधून प्रचार करा, असे आवाहन यावेळी उपस्थितांशी बोलताना केले. याप्रसंगी भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शिवसेनेचे किरण सामंत यांच्यासह महायुतीचे स्थानिक पदाधिकारी आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.