
रत्नागिरी शहरातील मुरुगवाडा येथे रहाणारे राहुल भुते झाले दिग्दर्शक
*मुरुगवाडा येथे राहणारे चंदन भुते याचा मुलगा राहुल चंदन भुते आजपासून कलर्स मराठीवर सुरू होणाऱ्या ‘सुख कळले ‘ या मालिकेचा दिग्दर्शक आहे.सामान्य कुटुंबात राहून या मुलाने वडिलांच्या सोहम ट्रॅव्हल या व्यवसायात लक्ष न घालता मुंबईत जाण्याचे ठरवले. अभिनय क्षेत्रात काम करण्याचे ध्येय ठेवले. गेली आठ वर्षे अतोनात कष्ट घेतले.सर्व स्तरावर संघर्ष केला. यापूर्वी त्याला काम करण्यासाठी अधून मधून संधी मिळाल्या. आज त्याने उरी बाळगलेले स्वप्न पूर्ण होत आहे.तो या मालिकेचा प्रमुख दिग्दर्शक म्हणून त्याचं नाव मालिकेसाठी लागणार आहे. www.konkantoday.com