रत्नागिरी मध्ये ‘इन्फिगो आयकेअर मार्फत’ नवजात बालक डोळे तपासणी शिबिर
पूर्ण दिवस न भरता जन्मलेले बालक किंवा नवजात बालकाचे वजन १५०० ग्रॅमपेक्षा कमी असेल तर अशा बालकांच्या डोळ्यांची रेटिनातज्ज्ञांकडून तपासणीचे विशेष शिबिर इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलने आयोजित केले आहे. प्रसूती पूर्ण दिवस न भरता झाली असल्यास, बत्तीस आठवडे किंवा आठ महिने पूर्णपणे न भरता बाळाचा जन्म झाला असेल तर, जन्मानंतर बाळाला ऑक्सिजन लावावा लागला असेल तर, जन्मानंतर बाळाला पेटीत ठेवावे लागले असेल तर आणि जन्मानंतर बाळाला कावीळ झाली असेल तर या कारणांनी समस्या निर्माण झाली असल्यास इन्फिगोच्या प्रसिद्ध रेटिनातज्ज्ञांकडून बाळाच्या डोळ्याचा पडदा तपासणीसाठी या शिबिराचे आयोजन केले आहे. या तपासणीसाठी एक तास लागतो व पूर्वनोंदणी आवश्यक आहे. येत्या २४ व २५ एप्रिलला गुलमोहोर पार्क, खेड, २८ व २९ ला साळवीस्टॉप, रत्नागिरी आणि ३० ला साई लॉजसमोर, लांजा येथील इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलमध्ये ही तपासणी करण्यात येणार आहे. ही सुविधा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात फक्त इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे www.konkantoday.com