महागाईच्या आगडोंबात होरपळलेल्या वीज ग्राहकांना महावितरणचा शॉक, वीज ग्राहकांच्या माथी पुन्हा डिपॉझीट
महागाईच्या आगडोंबात होरपळलेल्या वीज ग्राहकांना महावितरण कंपनीने वीज दरवाढीसह डिपॉझीट बिलांच्या माध्यमातून आणखी एक शॉक दिला आहे. ग्राहकांना नियमित वीज बिलांबरोबरच अतिरिक्त सुरक्षा ठेव देयके या गोंडस नावाखाली दोन वीज बिले वाटत करण्यात आली आहेत. वीज बिलांच्या रक्कमेएवढीच या बिलांची रक्कम असून त्याची भरणा करण्याची मुदत देखील एक सारखीच आहे. यामुळे ग्राहकांत कमालीची संतापाची लाट पसरली आहे. दरवर्षी ही डिपॉझीट बिले भरायची कुठून असा सवाल गोरगरीबांसह सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे.महावितरण कंपनीचे ग्राहक अगोदरच हैराण झाले आहेत. त्यातच या महिन्यापासून वीज दरवाढ करून पुन्हा आगीत तेल ओतण्याचे काम करण्यात आले आहे. www.konkantoday.com