
चारित्र्याच्या संशयावरून नवविवाहितेला पेटविले , पतीविरुद्ध गुन्हा दाखल
पत्नीच्या चारित्र्याचा संशय आल्याने
दापोली ओणी येथे सौ. प्रेक्षणी शितेश औणकर (वय १८) या विवाहितेला तिच्या पतीनेच अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिल्याची दुर्दैवी घटना घडली आहे यामध्ये सदर विवाहिता जखमी झाली असून या प्रकरणी संशयीत आरोपी शितेश विश्वनाथ औणकर (वय – २६) आणि प्रतिभा विश्वनाथ औणकर या दोघांना अटक केलीआहे
प्रेक्षणी व शितेश यांचा प्रेमविवाह झाला होता परंतु त्यांच्यात सतत वाद होत असत
. १९ जुलै २०२० रोजी दुपारी ४ वा. शितेशनं आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला मारहाण केली. तेवढ्यावरच न थांबता तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला काडीपेटीनं पेटवून दिलं. या घटनेमध्ये विवाहितेच्या डोक्यावर, छातीवर, पोटावर, हातावर व उजव्या पायाच्या मांडीवर गंभीर जखमा झाल्या आहेत.तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत
या घटनेनंतर दापोलीमधून संतापाची लाट उसळत आहे. या दोघा आरोपींविरोधात सौ. प्रेक्षणी शितेश औणकर (वय १८) हिनं तक्रार दाखल केली आहे. याबाबत पोलीस तपास चालू आहे
www.konkantoday.com