जिल्हा परिषदेच्या शाळांच्या सुटीचा कालावधी निश्चित

जिल्हा परिषदेच्या शाळांच्या सुटीचा कालावधी निश्चित झाला असून, २ मे ते १५ जून या कालावधीत असणार आहे. यंदा सुमारे ४५ दिवस सुट्टी असल्यामुळे मुलांसह शिक्षक आनंदीत झाले आहेत.राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी शासनाने सूचना निर्गमित केल्या आहेत. त्या अनुषंगाने राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष २०२४-२५ सुरू करण्याबाबतच्या सूचना शिक्षण संचालयाने दिल्या आहेत. त्यानुसार आगामी शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू होणार आहे तर २ मे पासून उन्हाळी सुट्टीला सुरवात होणार आहे. त्यामुळे यावर्षी तब्बल ४५ दिवस सुट्टी असणार आहे. जिल्ह्यातील प्राथमिकच्या २ हजार ५०० आणि माध्यमिकच्या ३५० अशा जवळपास २ हजार ८५० शाळांना २ मे पासून शाळांना कुलुपे लागणार आहेत. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button