एबी स्वीच महामार्गाच्या कामगाराने विनापरवाना केला बंद? कारवाई करण्याची मागणी

महामार्गावर काम करणार्‍या कामगाराने संगमेश्‍वर शास्त्रीपूल येथील एबी स्वीच विनापरवाना बंद केला. विनापरवाना स्वीच बंद करणार्‍या कामगारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महावितरणने संगमेश्‍वर पोलीस ठाण्यात केली आहे.महामार्गावरील ठेकेदार कंपनीकडून विनापरवाना झाडे तोडण्याचे काम सुरू असतानाच विनापरवाना स्वीच ऑफ केला आहे. तसेच महामार्गावरील चौपदरीकरणाच्या बांधकामावर पाणी घालण्यासाठी कोळंबे येथील पाणी वापरण्यात येत आहे. या ठिकाणी ग्रामस्थांनी पाणी भरू नये म्हणून तक्रार दाखल केली आहे. असे असतानाही ठेकेदार कंपनीकडून सर्व तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थ, प्रवासीवर्ग आणि स्थानिक करीत आहेत. त्यामुळे लवकरच या प्रकरणी ग्रामस्थ वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे सांगण्यात आले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button