उद्धव ठाकरेंनी कधी शेती केलीय का?, खतांच्या किंमती माहिती आहे का? खतांवर किती जीएसटी लागतो हे माहिती आहे का-भाजपा नेते चंद्रकांत पाटील

* उद्धव ठाकरेंनी विदर्भातील सभेत हास्यास्पद आरोप पंतप्रधानांवर केला.शेतकरी १ लाखाचं खत घेतात, त्यावर १८ टक्के GST म्हणजे १८ हजार घेतात. त्यातलेच ६ हजार तुम्हाला परत देतात असं विधान केले होते. त्यावर भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंनी कधी शेती केलीय का?, खतांच्या किंमती माहिती आहे का? खतांवर किती जीएसटी लागतो हे माहिती आहे का असा प्रश्न केला. माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, खतांवर ५ टक्के जीएसटी लागतो आणि तो पुरवठादारापासून थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहचेपर्यंत इतका कमी होतो, समजा १ लाखाचं खत आहे, त्यावर ५ हजार जीएसटी असते, तेव्हा शेतकऱ्यांपर्यंत येईपर्यंत तो ३००-४०० रुपये होतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, शेतकरी सन्मान निधीतून ज्या शेतकऱ्यांना ६ हजार मिळतात तो अल्पभूधारक शेतकरी, गरीब, मजूर शेतकऱ्यांना मिळतात. त्याला १ लाखाचे खत घ्यावे लागत नाही. ४५ किलोची एक बॅग शेतकरी घेतो तेव्हा त्याला २६६ रुपये द्यावे लागतात. त्यावर कंपनीला अनुदान म्हणून १५६१ रुपये सरकारला द्यावे लागतात, त्यामुळे १९०० चं पोतं शेतकऱ्यांना २६६ रुपयाला मिळते असं त्यांनी म्हटलं.तसेच शेतीबद्दल काय माहिती नसताना हे बोलणं, १ लाखाचं खत घेणारा हा किती मोठा शेतकरी आहे त्याला शेतकरी सन्मान निधीतून पैसे मिळत नाहीत. काहीही बोलायचं, शेतकऱ्यांना आणि लोकांना भ्रमित करायचे यातून काहीही साध्य होणार नाही. रासायनिक खतांवर ५ टक्के जीएसटी आहे. प्रत्यक्षात १९०० रुपयांचं पोतं २६६ रुपयाला घ्यावे लागते. त्यामुळे तुमच्यानिमित्ताने शेतकऱ्यांना या गोष्टीची माहिती मिळाली असंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलं.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button