आंबा पल्पची मागणी कमी झाल्यामुळे सुमारे ३० टक्के माल पडून.
गतवर्षी दर अधिक असल्यामुळे आंबा पल्पची मागणी कमी झाल्यामुळे सुमारे ३० टक्के माल पडून राहिला आहे.यंदा मुबलक आंबा असल्यामुळे पल्पचे दर कमी राहण्याची शक्यता आहे. परिणामी, कॅनिंग व्यावसायिकांचे गणित यंदा कोलमडण्याची शक्यता आहे, असे कॅनिंग व्यावसायिक आनंद देसाई यांनी सांगितले.यंदा हापूसचा हंगाम मध्यात येऊन ठेपलेला असून, गतवर्षीच्या तुलनेत लवकर कॅनिंगला सुरवात झाली आहे. सध्या २५ ते ३२ रुपये प्रतिकिलो याबाबत कॅनिंग व्यावसायिक देसाई म्हणाले, गतवर्षी आंबा उत्पादन कमी होते. त्यामुळे कॅनिंगसाठी आंबा खरेदीचा दर ५० ते ७५ रुपये किलो इतका होता. उत्पादन खर्च अधिक झाल्याने पल्पचा किलोचा दर ६० ते ६५ रुपयांनी वाढला. गतवर्षी २२५ रुपये डब्याचा दर होता तर ३ किलो १०० ग्रॅमचा दर १७० आणि २०० रुपयांनी वाढला. पल्पचे दर अधिक असल्यामुळे आंबा बर्फी किंवा अन्य प्रक्रिया पदार्थांच्या किमती वाढल्या. त्यामुळे या पदार्थांची मागणी कमी झाली. आंबा प्रक्रिया पदार्थांच्या विक्रीवर ३८ टक्के फरक पडला. परिणामी, सुमारे ३० टक्के पल्प शिल्लक आहे. यावर्षी सुरवातीपासूनच आंबा अधिक आहे. कॅनिंगही एप्रिलमध्ये सुरू झाले असून, १५ मे पर्यंत मालही चांगला असेल. दर कमी असल्यामुळे पल्प अधिक बाजारात येईल. माल वाढल्यामुळे पुन्हा पल्पचे दर कमी होतील. १६० ते १७५ रुपये किलोने विकला जाऊ शकतो. २०२२ ला अशी परिस्थिती निर्माण झाली होती. यंदा हापूस खरेदीसाठी ग्राहक मोठ्या प्रमाणात आहे. अशी परिस्थिती बाजारात कमीवेळा पाहायला मिळते. www.konkantoday.com