१४ वर्षीय मुलीवर मातृत्व लादणार्या गुजरात येथील तरूणाविरूद्ध ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल
रत्नागिरीतील १४ वर्षीय मुलीवर मातृत्व लादणार्या गुजरात येथील तरूणाविरूद्ध ग्रामीण पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. योगेश कांतीभाई मकवाना (१, रा. अहमदाबाद गुजरात) असे या संशयित तरूणाचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध ग्रामीण पोलिसांकडून भादंवि कलम ३७६ व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ (पॉक्सो) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच योगेश मकवानाला पोलिसांकडून अटक करण्यात आली.पोलिसांच्या माहितीनुसार योगश मकवाना व पीडित १४ वर्षीय मुलगी यांची सोशल माध्यमावर ओळख झाली होती. यातून योगेशने पीडित मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवले. योगेशच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पीडिता ही ८ ऑगस्ट २०२३ रोजी बाजारात जाते, असे सांगून राहत्या घरातून निघून गेली. पीडिता ही सायंकाळपर्यंत घरी न परतल्याने तिच्या पालकांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी तपास करण्यात येत होता. तपासात पीडिता ही योगेश नावाच्या तरूणाबरोबर गेल्याचे पोलिसांना आढळले. मात्र दोघांचा थांगपत्ता लागत नव्हता. दरम्यान २५ मार्च २०२४ पीडित मुलीने आपल्या आईला फोन करून सर्व हकिगत कथन केली. तसेच आपण गर्भवती असल्याचेही सांगितले. पीडित मुलीला मुंबईत येण्यास तिच्या आईकडून सांगण्यात आले. त्यानुसार पीडिता ही मुंबई येथे नालासोपारा येथे आली असता पोलिसांकडून संशयित तरूण व पीडितेला ताब्यात घेण्यात आले. www.konkantoday.com