
पोलिसांच्या सतर्कतेमुळे वसई येथून बेपत्ता झालेला १४ वर्षीय मुलगा सापडला
वसई येथून बेपत्ता झालेला १४ वर्षीय मुलगा सागरी सुरक्षा दलाचे सहाय्यक पोलीस फौजदार प्रकाश कृष्णा सारंग याच्या समयसूचकतेमुळे सापडून आला. बेवारस स्थितीत हा मुलगा १२ जानेवारी २०२४ रोजी मांडवी एक्स्प्रेस गाडीत आढळून आला होता. त्याच्या पालकांकडे मुलाला सुपूर्द करण्यासाठी रत्नागिरी पोलिसांकडून या मुलाला वसई येथील माणीकपूर पोलिसांच्या हवाली करण्यात आले.
मेहरान हनीफ पठाण (१४, रा. वसई, जि. पालघर) हा राहत्या घरातून बेपत्ता झाला होता. या प्रकरणी त्याच्या पालकांनी वसई येथील माणीकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दरम्यान सागरी सुरक्षा दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश सारंग हे १२जानेवारी रोजी मांडवी एक्स्प्रेस गाडीने रत्नागिरी ते सिंधुदुर्ग असा प्रवास करत होते. ट्रेनमध्ये मेहरान हा बेवारस स्थितीत सापडला. यावेळी सारंग यांना संशय आल्याने त्यांनी मुलाला विश्वासात घेवून त्याची चौकशी केली. त्यावेळी हा मुलगा वसई येथून घरातून पळून आल्याचे त्यांच्या लक्षात आले.
www.konkantoday.com