लाटांच्या तडाख्यामुळे रत्नागिरी समुद्रात एक मच्छीमार नौका उलटली कोणतीही जीवितहानी नाही
समुद्रातील जोरदार वाऱ्यामुळे उसळलेल्या लाटांच्या तडाख्यामुळे रत्नागिरी समुद्रात एक मच्छीमार नौका उलटली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. नौकेचे मात्र नुकसान झाले.रत्नागिरी समुद्रात १२ नौटीकल मैल अंतराबाहेर बाळा मेस्त्री यांच्या मालकीची नौका संध्याकाळच्या वेळी मासेमारी करत होती.समुद्रात वाऱ्यामुळे उसळलेल्या लाटांच्या तडाख्याने मच्छीमार नौका उलटली. आजुबाजूला मासेमारी करणाऱ्या इतर नौकांनी खलाशी आणि तांडेलना सुखरुप किनाऱ्यावर आणले.www.konkantoday.com