
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघामध्ये आता १४ लाख ५१ हजार ६३० मतदारांची नोंदणी
१९ एप्रिलला अंतिम झालेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघामध्ये आता १४ लाख ५१ हजार ६३० मतदारांची नोंदणी झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी दिली.नव्या नोंदणीनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील लोकसभा मतदार संघातील रत्नागिरी विधानसभा मतदार संघात २,८३,५५२ चिपळूण विधानसभा मतदार संघात २,६९,७९१ तर राजापूर विधानसभा मतदार संघात २,३३,७२१ मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. या तीनही मतदार संघात मिळून आता ७,८७,०६४ मतदारांची नोंदणी झाली आहेतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली विधानसभा मतदार संघात २,२७,७३५ कुडाळ विधानसभा मतदार संघात २,१२,३६० तर सावंतवाडी विधानसभा मतदार संघात २,२४,४७१ मतदारांची नोंद झाली असून तीनही विधानसभा मिळून ६,६४ ५६६ मतदारांची नोंदणी करण्यात आली आहेwww.konkantoday.com