
रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शीळ धरणात बुडून दोघा छोट्या मुलांचा मृत्यू
* रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शीळ धरणात बुडून दोघा छोट्या मुलांचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. रत्नागिरीतील फणसवळे आंबेकर कोंडवाडीतील तनिष्क अक्षय आंबेकर (वय 8, इयत्ता पहिली), स्मित वासुदेव आंबेकर (वय 7, अंगणवाडी) अशी बुडालेल्या दोघा चिमुरड्यांची नावे आहेत.सोमवारी दुपारी वाडीतील ग्रामस्थांचा डोळा चुकवून हे दोघेही पोहण्यासाठी शीळ धरणावर पोहचले होते. बराचवेळ न दिसल्याने ग्रामस्थांनी दोघांची शोधाशोध सुरू केली. यावेळी शीळ धरणात प्रथम एकाचा नंतर एकाचा मृतदेह सापडून आला. दोघांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.www.konkantoday.com