दापोली तालुक्यात दोघांच्या आत्महत्या

* दापोली तालुक्यात कुंभवे आणि कोकंबाळी दापोली येथे व वर्ष ३५ आणि वय वर्ष २८ अशा दोघांनी वेगवेगळ्या कारणास्तव आपापल्या घराच्या परिसरात आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या आत्महत्यांची नोंद एकाच दिवशी २१ एप्रिल रविवार रोजी दापोली पोलीस स्थानकात करण्यात आली आहे याबाबत दापोली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसारदापोली तालुक्यातील कुंभवे पाटीलवाडी येथील राजेंद्र लक्ष्मण हुमणे वय ३५ यानी काल रात्री साडेनऊच्या सुमारास घराचेबाहेरील झाडाला वायरने गळफास लावून आत्महत्या केली .सदरबाब लक्षात आल्यानंतर राजेंद्र हुमणे यांना दापोली उपजिल्हा रुग्णालयात पुढील उपचाराकरता दाखल करण्यात आले; मात्र सकाळी सात वाजून चाळीस मिनीटानी वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय दापोली यांनी लक्ष्मण हुमणे यांना मृत घोषित केले.आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या घटनेचा पुढील तपास मपोहेकाँ सुकाळे करित आहेत. दरम्यान आज दिनांक २१ एप्रिल रोजी दुपारी केदार श्रीकांत बागडे कोकंबाळी दापोली वय २८ याने आजारपणाला कंटाळून रहात्या घरी साडीने पंख्याला लटकून गळफास घेऊनआत्महत्या केली.उपजिल्हारूग्णालय दापोली येथे त्याला दाखल केले असता रविवार दिनांक २१ रोजी दुपारी दीड वाजणेचे दरम्यान वैद्यकीय अधिकारी उपजिल्हारूग्णालय दापोली यांनी त्याला मृत घोषित केलेwww.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button