एकीकडे कोकण रेल्वेगाड्या विक्रमी गर्दीने धावत असलल्याने विकेंडला ९ रेल्वेगाड्यांना लेटमार्क

एकीकडे कोकण रेल्वेगाड्या विक्रमी गर्दीने धावत असलल्याने जागा मिळवताना प्रवाशांना घाम फुटत असतानाच दुसरीकडे विलंबाच्या प्रवासाची भरही कायमच आहे. शनिवारी विकेंडला रेल्वेगाड्या उशिराने धावल्या असतानाच रविवारीसुद्धा ९ रेल्वेगड्यांना लेटमार्क मिळाला. कोच्युवेली-एलटीटी तब्बल ६ तास तर जबलपूर-कोईमतूर स्पेशल तब्बल साडेचार तास उशिराने मार्गस्थ झाल्याने प्रवाशांची रखडपट्टी झाली. अन्य ७ रेल्वेगाड्यांच्या सेवेवरही परिणाम झाला.कोकण मार्गावर विकेंडला उशिराने धावणार्‍या रेल्वेगाड्यांमुळे प्रवाशांना मनस्तापच सहन करावा लागत आहे. रविवारी ७ रेल्वेगाड्या विलंबाने मार्गस्थ झाल्याचा प्रवाशांना फटका बसला. जबलपूर-कोईतूर स्पेशल साडेचार तास तर एलटीटी-थिविम उन्हाळी स्पेशल चार तास २० मिनिटे विलंबाने धावली. नागपूर-मडगाव स्पेशल २ तास १५ मिनिटे उशिराने रवाना झाली. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button