
एकही नामनिर्देशन पत्र माघार नाही -निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह
रत्नागिरी, : 46 रत्नागिरी –सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीसाठी एकूण 9 उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्रापैकी एकही नामनिर्देशन पत्र माघार घेतले नसल्याने एकूण नऊही उमेदवार निवडणुकीसाठी राहिले असून, त्यांना चिन्हांचे वाटप केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली. उमेदवारांची नावे पक्ष व चिन्ह अनुक्रमे पुढीलप्रमाणे –आयरे राजेंद्र लहू (बहुजन समाज पार्टी) हत्ती, नारायण तातू राणे (भारतीय जनता पार्टी) कमळ, विनायक भाऊराव राऊत (शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे) मशाल, अशोक गंगाराम पवार (बहुजन मुक्ती पार्टी) खाट, मारुती रामचंद्र जोशी (वंचित बहुजन आघाडी) प्रेशर कुकर, सुरेश गोविंदराव शिंदे (सैनिक समाज पार्टी) शिट्टी, तांबडे अमृत अनंत (अपक्ष) पेनाची निब सात किरणांसह, विनायक लवु राऊत (अपक्ष) चिमणी, शकील सावंत (अपक्ष) माईकwww.konkantoday.com