
रत्नागिरी शहरात १० पासून संपर्कयात्रेचे आयोजन, माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांचा उपक्रम.
नागरिकांच्या विविध समस्या संदर्भात माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी येत्या १० एप्रिलपासून ’शहर संपर्क यात्रा’ कार्यक्रम हाती घेतला आहे. त्याद्वारे विविध ठिकाणी लोकांच्या समस्यांसंदर्भात चर्चासत्र आयोजित केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. नुसते उद्योग कोकणात आणून स्किल डेव्हलपमेंटचे कार्यक्रम योजना करून बेरोजगारी संपणार ’नाही. बेरोजगारी कमी करण्यासाठी नियोजन करायचे असेल, तर त्या संबंधित लोकांशी सर्वप्रथम चर्चा करणे आवश्यक आहे. त्यासाठी चचर्चासत्र वे आयोजन बेरोजगारी विषयावर आहे. त्यानंतर महिला – सक्षमीकरण, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या अशा विविध विषयांवर चर्चासत्र आयोजित करणार आहोत.
त्याची रूपरेषा लवकरच ठरवली जाणार असल्याचे मिलींद कीर यांनी सांगितले आहे. या उपक्रमाची योजना मिलिंद कीर व निलेश भोसले यांनी आखली आहे. चर्चासत्राला जास्तीत जास्त ३० ते ४० व्यक्ती एका कार्यक्रमात सहभागी होतील, जेणेकरून चर्चा करतानाही सोयीस्कर ठरणार आहे. बेरोजगारी, महिला सक्षमीकरण, करियर निवड, विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नियोजन, महिला बचतगट, सिनीयर सिटीझन आरोग्य, आर्थिक नियोजन आदी विषयांवर ही चर्चासत्रे होणार असल्याचे सांगण्यात आले.www.konkantoday.com