कोकण रेल्वे मार्गावर उद्या अडीच तासांचा मेगाब्लॉक
करंजाडी चिपळूणदरम्यान मालमत्तेच्या देखभाल दुरूस्तीसाठी कोकण रेल्वेने २३ एप्रिल रोजी अडीच तासांचा मेगाब्लॉक घोषित केला आहे. दुपारी १.१० ते दुपारी ३.४० या दरम्यान हे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे नियमित वेळापत्रकानुसार या विभागातून धावणार्या तीन गाड्यांच्या वेळापत्रकात अंशतः बदल करण्यात आल्याचे कोकण रेल्वेने कळविले आहे.कोकण रेल्वेने मान्सूनपूर्व कामांना गती दिली आहे. त्यानुसार आवश्यक त्या मार्गावर मेगाब्लॉक घेवून दुरूस्तीची कामे केली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवार २३ एप्रिल रोजी करंजाडी-चिपळूणदरम्यान अडीच तासांचा मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. कोईंबतूर-जबलपूर (०२१९७) या विशेष गाडीचा २२ एप्रिलचा प्रवास रत्नागिरी-कामथे स्थानकादरम्यान ७० मिनिटांसाठी रोखून धरला जाणार आहे. त्याचप्रमाणे सावंतवाडी रोड-दिवा एक्स्प्रेस (१०१०६) या गाडीचा २३ एप्रिल रोजी सुरू होणारा प्रवास सावंतवाडी रोड-रत्नागिरी स्टेशनदरम्यान १ तास ४० मिनिटांसाठी स्थगित केला जाणार आहे. तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस-तिरूअनंतपुरम सेंट्रल (१६३४५) एक्सप्रेसचा २३ एप्रिल रोजी सुरू होणारा प्रवास कोलाड-वीर स्टेशन दरम्यान ५० मिनिटांसाठी स्थगित केला जाईल, असे कोकण रेल्वेने स्पष्ट केले आहे.www.konkantoday.com