
सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठी ‘निर्भय बनो’ अभियानाच्या माध्यमातून जनजागृती.
* लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संविधान विरोधी काम करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठी ‘निर्भय बनो’ अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत मतदारांत जनजागृती करण्यात येणार आहे, अशी माहिती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत या अभियानाचे समन्वयक अॅड. संदीप निंबाळकर व किशोर वरक यांनी दिली. या अभियानाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रविवारी (ता.२१) सायंकाळी ६ वाजता सावंतवाडीत तर कुडाळ येथे सभा आयोजित केली आहे.लोकशाही आणि संविधानबाबत जनजागृती करण्यासाठी राज्यात डॉ. विश्वंभर चौधरी व ॲड. असिम सरोदे यांनी सुरू केलेल्या ‘निर्भय बनो’अभियानाअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी व कुडाळ रविवारी जाहीर सभा आयोजित केली आहे. लोकशाही व संविधान हरण करणाऱ्या निर्भय बनो सभेतून प्रश्न उपस्थित करण्यात येणार असल्याची माहिती अॅड. निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.www.konkantoday.com