विशाल पाटील यांना माघार घ्यायला लावण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून काँग्रेसवर प्रचंड दबाव
सांगली लोकसभेच्या जागेवरूनमहाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये सुरू असलेला वाद अजूनही कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.विशाल पाटील यांना कोणत्याही परिस्थितीत माघार घ्यायला लावण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून काँग्रेसवर प्रचंड दबावतंत्राचा वापर सुरू आहे. प्रदेश काँग्रेसकडूनही विशाल पाटील यांना मेसेज देण्यात आला आहे. बंडखोरी केल्यास निलंबनाची कारवाई करावी लागेल, असा इशारा प्रदेश काँग्रेसकडून विशाल पाटील यांना देण्यात आला आहे.www.konkantoday.com