लोकसभा निवडणुकीसाठी नवख्या निशाण्या धनुष्यबाण ‘आऊट’ ः ‘कमळ’ विरुद्ध ‘मशाल’ रिंगणात
*रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील भाजप युती आणि ठाकरे गट शिवसेना महाविकास आघाडी यांच्यामधील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे; मात्र मतदारांसाठी दोघांचीही निवडणूक चिन्हे नवखी आहेत. यावेळी प्रथमच तत्कालीन शिवसेनेची ‘धनुष्यबाण’ निशाणी ‘आऊट’ तर भाजपची कमळ निशाणी ‘इन’ झाली आहे. या लोकसभा मतदारसंघात कमळ निशाणीवर प्रथमच उमेदवार रिंगणात असल्याने ही जागा जिंकून भाजपला आजवरची कसर भरून काढायची आहे. तर ‘मशाल’ निशाणीवर लढत शिवसेनेला विजयाची हॅट्ट्रिक साधायची आहे. चिन्हांच्या प्रचारासाठी कसरत करावी लागणारयावेळच्या निवडणुकीत प्रथमच मतदारांसाठी नवख्या निशाण्या आहेत. यावेळी तत्कालीन शिवसेनेची ‘धनुष्यबाण’, काँग्रेसची ‘हात’ निशाणी नाही. ठाकरे गट शिवसेनेची काँग्रेसबरोबर आघाडी असल्याने येथील जागा ठाकरे गट शिवसेना पक्षाच्या वाट्याला आली. त्यामुळे ठाकरे गट शिवसेनेला ‘मशाल’ चिन्हाचा प्रचार करावा लागणार आहे, तर भाजपची ‘कमळ’ निशाणीही प्रथमच रिंगणात असल्याने मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी अधिक परिश्रम करावे लागणार आहेत. दोन्ही उमेदवारांना आपापल्या निशाण्या मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक काळजी घ्यावी लागणार आहे. www.konkantoday.com