रायगड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरेंकडे १४.५७ कोटींची मालमत्ता
रायगड लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत महायुतीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रात आपल्याकडे १४ कोटी ५७ लाख ५७ हजारांची मालमत्ता असल्याचे जाहीर केले आहे. शेती हा प्रमुख व्यवसाय असलेल्या तटकरे व त्यांच्या पत्नीकडे २०१९ मध्ये १२ कोटी ६४ लाख ८५ हजारांची एकूण मालमत्ता होती. यात पाच वर्षात १ कोटी ९२ लाख ८२ हजारांची वाढ होवू ती ९२ लाख ८२ हजारांची वाढ होवून ती २०२४ मध्ये १४ कोटी ५७ लाख ८२ हजार झाली आहे.www.konkantoday.com