
महामार्गावरील गुणदे फाटा येथे दुचाकीला अपघात ; दुचाकीस्वार गंभीर जखमी
खेड : लोटे औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यात काम करण्याऱ्या नातेवाईकाला जेवणाचा डबा देऊन परतणाऱ्या दुचाकीस्वाराला मालवाहू ट्रक ने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. सुशांत रा. धापसे असे या २२ वर्षीय दुचाकीस्वाराने नाव असून तो घाणेखुंट तळेवाडी येथील रहिवाशी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
सुशांत हा आज सकाळी औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यात काम करणाऱ्या आपल्या नातेवाईकाचा जेवणाचा डबा पोहचविण्यासाठी गेल्या होता. कारखान्याच्या गेटवर डबा दिल्यावर तो दुचाकीने घराकडे परतत असताना चिपळूणकडून औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या मालवाहू ट्रकची त्याला जोरदार धडक बसली. या अपघातात सुशांत रस्त्यावर जोरात आदळल्याने गंभीर जखमी झाला.
जखमी सुशांत यास तात्काळ चिपळूण येथील लाईफ केअर रुग्णालयात व तिथून पुढे कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे. खेड पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून पोलीस तपास करत आहेत.
www.konkantoday.com